Maha Shivratri 2019: महाशिवरात्री निमित्त शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी WhatsApp Messages, SMS, Wishes आणि शुभेच्छापत्र!

भगवान शंकर ह्याच्या उपवासामधील महाशिवरात्री ही फार महत्वाची मानली जाते. या दिवशी भाविक उपवास करुन भगवान शंकराची पूजा करतात. तसेच महाशिवरात्रीचा उत्सव हा देशभरात आनंदाने साजरा केला जातो. तर भाविकही शंकराच्या मंदिरात या दिवशी शंकराची पूजा करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती लावतात. भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी शिवलिंगावर दूध आणि पाण्याचा अभिषेक करतात. या दिवशी बेलाचे पान, चंदन,धुप, दीप, भांग, धतूरा आणि फुलांनी भगवान शंकराची पूजा केली जाते. खरतर शिवरात्री प्रत्येक महिन्यात येते. मात्र फाल्गुन महिन्यात येणाऱ्या महाशिवरात्रीचे खास महत्व असल्याचे मानले जाते.

यंदा महाशिवरात्री 4 मार्च रोजी असणार आहे. मुख्य म्हणजे येणारी महाशिवरात्री ही सोमवारी आल्याने भगवान शंकराला सोमवार हा अत्यंत प्रिय असल्याचे सांगितले जाते. तर महाशिवरात्री निमित्त तुम्हाला कोणाला शुभेच्छा द्यायच्या असतील तर खास मराठीत मेसेज, व्हॉट्सॅप मेसेज,Images आणि शुभेच्छा द्या.

शिव शंकरांचा महिमा अपरंपार !

शिव करतात सर्वांचा उद्धार,

त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी असो,

आणि भोले शंकर आपल्या जीवनात नेहमी

आनंदच आनंद देवो…

महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!

बेलाचे पान वाहतो महादेवाला

करतो वंदन दैवताला

सदा सुखी ठेव माझ्या प्रिय जनांना

हिच प्रार्थना शिव शंभो शंकराला ||

या दिवशी उपवासाचे व्रत करतात. भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसर्‍या दिवशी व्रताची सांगता केली जाते. शिवरात्रीच्या दिवशी एकभुक्त राहावे. शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्या, असे विधान आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *