“आता अभिनंदनचा अर्थ बदलला जाईल” – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली: देश आता एक पराक्रमी राष्ट्र म्हणून पुढे जात आहे. भारताच्या प्रत्येक गोष्टीकडे जगाचे लक्ष लागले आहे. ‘या देशात अशी ताकद आहे की, शब्दांचा अर्थ बदलला जातो. आधी अभिनंदनचा अर्थ इंग्रजीत ‘Congratulation’ असा होता. मात्र, आता अभिनंदनचा अर्थ बदलला जाईल.’ असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आय ए एफ पायलट अभिनंदन वर्थमान यांच्या शोर्याचं कौतूक केलं आहे.

भारताने डिक्शनरीतील अभिनंदन शब्दाचा अर्थ आता बदलला आहे. या देशात शब्दांचा अर्थ बदलण्याची ताकद आहे, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. नवी दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये ‘कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी इंडिया 2019’चे उद्धाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

अभिनंदन वर्धमान यांनी दाखवलेल्या शौर्याचा अभिमान सर्वच भारतीयांना आहे. शुक्रवारी रात्री सर्व कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पाकिस्तानने अभिनंदन वर्धमान यांना वाघा बॉर्डरहून भारताच्या स्वाधीन केले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण देश सज्ज होता.

गेल्या महिन्यात 14 फेब्रुवारी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या विमानांनी मंगळवारी (26 फेब्रुवारी) पहाटे पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानने बुधवारी (27 फेब्रुवारीला) सकाळी भारतात घुसखोरी केली. यावेळी पाकिस्तानच्या विमानांना पिटाळून लावताना भारताचे मिग-21 लढाऊ विमान कोसळले असता विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी पॅराशूटद्वारे खाली उडी मारली. मात्र,अभिनंदन वर्धमान हे पाकिस्तानच्या हद्दीत गेले. त्यावेळी त्यांना पाकिस्तानच्या लष्कराने ताब्यात घेतले. अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेची आग्रही मागणी भारताने केली होती. त्यानंतर पाकिस्तानने शुक्रवारी रात्री अभिनंदन वर्धमान यांना भारताकडे सुपूर्द केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *