अभिनेता “अभिषेक देशमुख” याची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री…तर बहीण टिकटॉक वर घालते धुमाकूळ.

अभिषेक देशमुख हा मराठी नाटक, मालिका ,चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहे. “पसंत आहे मुलगी” या मालिकेत त्याने पुनर्वसूची भूमिका बजावली होती. या मालिकेमुळे अभिषेक घराघरात जाऊन पोहोचला होता. अभिनेता अभिषेक देशमुख हा पेशाने अर्किटेक्ट आहे. त्याचे वडील सतीश देशमुख हे सिव्हिल इंजिनिअर असले तरी त्यांनी अभिनय क्षेत्रात काम केले आहे. नाटक, मालिका आणि चित्रपटात त्यांनी छोट्या मोठ्या भूमिका बजावल्या आहेत. पण सध्या अभिषेक देशमुख वेगळ्याच चर्चेत पाहायला मिळतोय.

६ जानेवारी २०१८ रोजी अभिनेता अभिषेक देशमुखने “कृतिका देव” या अभिनेत्रीसोबत लग्न केले आहे. राजवाडे अँड सन्स, बकेट लिस्ट मध्ये माधुरीच्या मुलीची भूमिका तिने बजावली आहे. डेट गॉन रॉग, सुनीता सारख्या वेबसिरीज तिने साकारल्या आहेत. याशिवाय इंटरनेट वाला लव्ह हा शो आणि अण्या या हिंदी चित्रपटात काम केले आहे. नुकताच अभिषेक ने त्याच्या फेसबुक अकाउंटवर लग्नाचा फोटो शेअर करत लिहलय. “१ वर्ष पूर्ण…1st Anniversary..We both are Shooting Today! Working in Different cities..Too Far,Too Close..Nothing Else Matters.”
तर “अमृता देशमुख” ही अभिषेकची सख्खी बहीण आहे. फ्रेशर्स मालिकेत तिने परी देशमुख साकारलेली पाहायला मिळाली. “तुमचं आमचं सेम असतं” या स्टार प्रवाह वरील मालिकेत गौरी आणि “देवाशप्पथ ” या झी युवा वरील मालिकेत तिने देवी ची भूमिका निभावली आहे. टिकटॉक सारख्या म्युजिकली व्हिडिओजमध्ये सध्या अमृता देशमुख धुमाकूळ घालताना दिसत आहे. याआधी फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही ती अशाप्रकारचे व्हिडिओ टाकायची. रेश्माच्या रेघांनी, जाऊ दे ना व, मै बनी ‘तेरी राधा सारखी हिंदी मराठी गाण्यावरील तिच्या व्हिडीओजना प्रेक्षकांकडून भरपूर पसंती मिळत आहे.

हा लेख Bolkyaresha वरून घेतलेला आहे….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *